भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
धरणगाव येथे अखिल भारतीय सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळ, जळगाव यांच्या वतीने आयोजित मराठा समाज मेळावा
आज धरणगाव येथे अखिल भारतीय सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळ, जळगाव यांच्या वतीने आयोजित मराठा समाज मेळावा व विविध कार्यक्रमांना भेट देऊन समाजबांधवांशी संवाद साधला. यावेळी नवीन मंगल कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा, वधू-वर परिचय मेळावा, विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच नवनियुक्त नगरसेवक आणि शैक्षणिक, सामाजिक, कृषी, राजकीय व उद्योजकीय क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. समाजातील गुणवंतांचा गौरव, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि समाजाच्या एकजुटीसाठी असे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत. नवीन मंगल कार्यालयाच्या माध्यमातून समाजाला एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, ही आनंदाची बाब आहे. या सुंदर आयोजनाबद्दल मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन! समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण प्रगतीसाठी सुरू असलेल्या या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी माजी पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी देवकर, समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





