भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
तिळवण तेली समाज, धुळे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा
तिळवण तेली समाज, धुळे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आज धुळे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माझ्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी धुळे शहराचे आमदार श्री. अनुपभैया अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. सुभाषबाबा भामरे, भाजपाचे माजी महामंत्री श्री. विजुभाऊ चौधरी, माजी आमदार श्री. शिरीषदादा चौधरी, डॉ. तुळशीराम गावित, माजी आमदार श्री. शरद पाटील सर, सौ. कल्पनाताई महाले, सौ. प्रतिभाताई चौधरी, भाजपा महानगराध्यक्ष श्री. गजेंद्रजी अंपाळकर, समाजाचे अध्यक्ष तथा माजी महापौर श्री. भगवान बापू करंकाळ, धरणगावच्या नगराध्यक्षा सौ. लीलाताई चौधरी, तळोदा नगराध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई चौधरी, माजी महापौर श्री. चंद्रकांत बापू सोनार, श्री. संदीप तात्या महाले, श्री. युवराज भाऊ चौधरी, श्री. सतीश तात्या महाले, श्री. रामेश्वर बापू चौधरी, श्री. भटू बापू चौधरी, श्री. कैलास भाऊ चौधरी, भाजपा प्रवक्ते श्री. संजय भाऊ शर्मा, चाळीसगाव समाज मंडळाचे अध्यक्ष डी. आर. दादा चौधरी, उपनगराध्यक्ष श्री. हर्षल चौधरी, श्री. किरण तात्या चौधरी, श्री. अनिल भाऊ चौधरी, श्री. सुरेश आण्णा चौधरी, श्री. राजू अण्णा चौधरी तसेच वधू-वर परिचय समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक श्री. सनी चौधरी यांच्यासह हजारोंच्या संख्येने समाजबांधव, माता-भगिनी उपस्थित होते. विवाह हा दोन व्यक्तींसोबत दोन कुटुंबांना जोडणारा पवित्र संस्कार आहे. मात्र, आजच्या काळात विवाह सोहळ्यांमध्ये अनावश्यक खर्च आणि दिखाऊपणाला फाटा देऊन कमी खर्चात विवाह आयोजन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर आपल्या समाजातील प्रत्येक मुला-मुलीने उच्च शिक्षण घ्यावे, व्यसनांपासून दूर राहावे आणि एक सुशिक्षित, सुसंस्कृत व निर्व्यसनी पिढी घडविण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. समाजातील युवक-युवतींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणारा हा अत्यंत स्तुत्य व आदर्श उपक्रम आहे. या उपक्रमाचे आयोजन करणारे समाजाचे अध्यक्ष, वधू-वर परिचय समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!






















