भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
माझ्या लाडक्या बहिणी सोनाताई आणि मोनाताई तसेच भाचे-भाचींसोबत भाऊबीज साजरी
आज माझ्या लाडक्या बहिणी सोनाताई आणि मोनाताई तसेच भाचे-भाचींसोबत भाऊबीज साजरी करण्याचा आनंद मिळाला. यावेळी लाडक्या बहिणींनी आणि भाचींनी औक्षण करून प्रेमाने आशीर्वाद दिले. या प्रेमळ क्षणांनी मन अगदी भरून आले. राजकारण, समाजकारण आणि दैनंदिन कामाच्या धावपळीत कुटुंबासोबत घालवलेले असे आनंदाचे क्षण मनाला नवी ऊर्जा देतात. बहिणींचे प्रेम, माया आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी अनमोल शिदोरी आहे.





