भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री मा. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री मा. श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज जळगांव येथे संपन्न झाली. यावेळी निवडणुकीचे नियोजन, रणनीती व पुढील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी गिरीशभाऊंचे मार्गदर्शन प्राप्त झाले. सर्व पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून आणि एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजयभाऊ सावकारे, खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार श्री राजू मामा भोळे, आमदार श्री नंदू भाऊ महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. #JDCC #Jalgaon #BankElection






