भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ 7502547777 ई-मेल

कार्यक्रम

आंबेहोळ येथील माझी बहीण, आशा वर्कर सौ. कमलताई अनिल पवार यांच्या घरी अगदी हक्काने जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला.

📅 ११ नोव्हेंबर २०२६ · 📍 लोजे आंबेहोळ ता.चाळीसगाव · 📸 ७ फोटो

चाळीसगाव तालुक्यातील १५०० हून अधिक आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई या माझ्यासाठी केवळ आरोग्य व बालविकास क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचारी नाहीत, तर त्या माझ्या हक्काच्या बहिणी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी भाऊबीजेच्या निमित्ताने या सर्व बहिणींचा सन्मान करून त्यांना साडीची भेट देण्याची आपली एक सुंदर परंपरा सुरू आहे. मात्र, या साडीच्या भेटीपेक्षाही अनमोल आहे ते आमच्यात निर्माण झालेलं भावा-बहिणीचं जिव्हाळ्याचं नातं! आज तालुक्यातील कुठल्याही गावात गेलो, की या माझ्या बहिणी आपल्या हक्काच्या भावाचं ज्या आपुलकीने, प्रेमाने स्वागत करतात, ते पाहून मन अक्षरशः भरून येतं. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि प्रेम हीच माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. आज लोजे आंबेहोळ येथे भाऊबीज सोहळ्यानिमित्त गेलो असता असाच एक मनाला स्पर्शून जाणारा क्षण अनुभवायला मिळाला. आंबेहोळ येथील माझी बहीण, आशा वर्कर सौ. कमलताई अनिल पवार यांच्या घरी अगदी हक्काने जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. आपल्या भावासाठी बहिणीने प्रेमाने वाढलेलं जेवण, घरातील मायेचं वातावरण आणि सर्वांच्या चेहऱ्यावरील समाधान… या सगळ्याची सर कोणत्याही मोठ्या पाहुणचाराला येणार नाही! यावेळी अंगणवाडी सेविका संगीताबाई राठोड, भारती पाटील, आशा वर्कर अनिता राठोड, मदतनीस सुनिता पाटील तसेच सरपंच सौ.वैशालीताई संदीप संदीप राठोड या उपस्थित होत्या. भाऊबीजेच्या निमित्ताने मी माझ्या बहिणींना साडीची भेट देतो, पण या हजारो बहिणी मला दरवर्षी जे भरभरून प्रेम, माया आणि आशीर्वाद देतात, त्याची परतफेड कोणत्याही भेटवस्तूने होऊ शकत नाही. माझ्या या सर्व लाडक्या बहिणींचं प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! ❤️

आंबेहोळ येथील माझी बहीण, आशा वर्कर सौ. कमलताई अनिल पवार यांच्या घरी अगदी हक्काने जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. आंबेहोळ येथील माझी बहीण, आशा वर्कर सौ. कमलताई अनिल पवार यांच्या घरी अगदी हक्काने जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. आंबेहोळ येथील माझी बहीण, आशा वर्कर सौ. कमलताई अनिल पवार यांच्या घरी अगदी हक्काने जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. आंबेहोळ येथील माझी बहीण, आशा वर्कर सौ. कमलताई अनिल पवार यांच्या घरी अगदी हक्काने जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. आंबेहोळ येथील माझी बहीण, आशा वर्कर सौ. कमलताई अनिल पवार यांच्या घरी अगदी हक्काने जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. आंबेहोळ येथील माझी बहीण, आशा वर्कर सौ. कमलताई अनिल पवार यांच्या घरी अगदी हक्काने जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. आंबेहोळ येथील माझी बहीण, आशा वर्कर सौ. कमलताई अनिल पवार यांच्या घरी अगदी हक्काने जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला.